दिल्ली पोलिसांनी हातात काय बांगड्या भरल्यात काय?; मशीदीवर भगवा लावल्याने काँग्रेस नेता भडकला

मुंबई |  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरू असताना दुसरीकडे दिल्लीतील वातावरण ताणावपूर्ण आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला आता हिंसाचाराचं गालबोट लागलं आहे. राजधानीत हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला असून समाजविघातक घटकांनी दिल्लीच्या विविध भागात आगी लावल्याच्या घटना घडल्या आहेत. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये काही समाजकंटक मशीदीवर भगवा झेंडा लावत आहे. यावर निरूपम यांनी दिल्ली पोलिसांना लक्ष्य करत पोलिसांनी हातात काय बांगड्या भरल्यात काय?, असा बोचरा सवाल विचारला आहे.

सर्वधर्म समभाव हा हिंदूधर्माचा श्वास आहे. धर्मस्थळ कुणाचं जरी असलं तरी तिथे ईश्वराचा वास असतो, असं म्हणत निरूपम यांनी समाजकंटकांना खडेबोल सुनावले आहेत. ईश्वराचा अनादर करणं हे पाप असल्याचं त्यांनी म्हटलंय.

तसंच हातात भगवा घेऊन पाप करणं हा अधिकार कुणालाही नाहीये, असं ठणकावून सांगत त्यांनी या समाजकंटाकांना अटक करण्याचं आवाहन दिल्ली पोलिसांना केलं आहे. तसंच दिल्ली पोलिसांच्या शांसतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी हातात काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल केला आहे.

दिल्लीच्या हिंसाचाराचे व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाले असून हा आपला भारत आहे का?, असा प्रश्न पडावा, अशी ही दृश्यं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-देशाला गुजरातचं दंगल मॉडेल नकोय; दिल्लीतल्या हिंसाचाराने जयंत पाटील अस्वस्थ

-तुकाराम मुंढेंचा हातोडा पडला गँगस्टर आंबेकरच्या बंगल्यावर; काही मिनिटांत बंगला जमीनदोस्त

-ट्रम्प ज्या पक्षाचे….. मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे- रामदास आठवले

-आता सरपंचाची निवड जनतेतून होणार नाही; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-उद्धवजी, क्या हुआ तुम्हारा वादा; मुनगंटीवारांनी करून दिली त्या आश्वासनाची आठवण