पुणे महाराष्ट्र

…भाजपवाल्यांनो हे फार काळ टिकणार नाही- सुशीलकुमार शिंदे

सोलापूर |  भाजपच्या इन्कमिंगवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी टीका केली आहे. साखर कारखानदारांची गळचेपी करून भाजपने जोरात इन्कमिंग चालवली आहे. पण हे फार काळ टिकणार नाही, असं सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं आहे. ते सोलापूरात बोलत होते.

सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. लवकरच काँग्रेसचे काही बडे नेते भाजपात प्रवेश करतील, त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसच्या एका तरी आमदाराने राजीनामा दिला का? असा सवाल त्यांनी विचारला.

साखर कारखानदारांना आमिष दाखवलं जात आहे. त्यांना संस्था टिकवायच्या आहेत. म्हणून काही नेते पक्षातरं करत आहेत, असं ते म्हणाले.

भाजपच्या नेत्यांनी पक्षांतर करणाऱ्यांना याअगोदर जी आश्वासने दिली होती ती पूर्ण झाली नसल्याने तेच नेते नाराज आहे, असंही शिंदेंनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मी पेलू शकत नाही आणि मी इच्छुकही नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-कर्नाटकातील राजकीय नाट्याला वेगळं वळण; ‘हा’ पक्ष देणार भाजपला पाठिंबा???

-चित्रा वाघ यांनी राजीनाम्याचं ट्वीट केलं अन् लोकं म्हणाले; ‘ताई तुम्हीसुद्धा…!’

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येतील; ‘या’ नेत्याचा दावा!

-या कारणामुळे चित्रा वाघ यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ला सोडचिठ्ठी???

-राणा जगजितसिंह पवारांना धक्का देणार??; राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार!

IMPIMP