मोठी बातमी! काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हार्ट अटॅकमुळे त्यांचं निधन झालं आहे.

दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचं पार्थिव कोल्हापुरात आणलं जाणार असल्याची माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. चंद्रकांत जाधव यांच्या अचानक एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळांशी फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामान त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता.

दरम्यान, चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

“2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला 300 जागा मिळतील असं…” 

प्रचंड मेहनत करुनही करिअरमध्ये यश मिळत नाहीये?, मग करा हे उपाय 

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली