काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपवर केली टीका; म्हणाल्या काँग्रेसच्या…

मुंबई | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेसने कन्याकुमारी ते काश्मीर (Kanyakumari to Kashmir) अशी 3570 किमी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) पदयात्रा आयोजित केली आहे.

या यात्रेवर सत्ताधारी पक्ष टीका करत आहेत, तर विरोधक यात्रेचे समर्थन करत आहेत. आता हे आरोप प्रत्यारोप सत्र सुरु असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी यात्रेवरुन भाजपला टोला लावला आहे.

अकोल्यात (Akola) त्या माध्यमांसोबत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेचे स्वरुप सांगताना ही यात्रा अकोल्यासह महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून जाणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असल्याने आमचे भाग्य आहे की, ही यात्रा अकोला जिल्ह्यातून जाणार आहे. यावेळी अकोल्यात राहुल गांधी सभा देखील घेणार आहेत.

राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहुन भाजपने धस्का घेतला आहे. त्यामुळे आमची ही यात्रा निष्प्रभ करण्यासाठी भाजप (BJP) निरनिराळ्या योजना तयार करत आहेत, असे शिंदे म्हणाल्या.

तसेच काही वृत्तवाहिन्या भाजपने आपल्या करुन घेतल्याने आमच्या यात्रेला तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. पण समाज माध्यामांवर (Social Media) आम्ही पोहचत आहोत आणि राहुल गांधींसोबत लाखो लोक चालत आहेत, असे देखील शिंदे म्हणाल्या.

भाजपने विचार केला नव्हता, त्यापेक्षा जास्त प्रतिसाद आणि लोकप्रियता या यात्रेला मिळत असल्याने भाजप आता पॅनिक मोडवर आला असल्याचे प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

राहुल गांधी शाळा आणि फार्महाऊसवर राहत आहेत. अगदी मुलभूत व्यवस्थेत राहुल गांधी राहत आहेत. ते भाजप नेत्यांसारखे उंची हॉटेलांत थांबत नाहीत, त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकत आहे, असा चिमटा प्रणिती शिंदे यांनी भाजपला काढला.

महत्वाच्या बातम्या –

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार सांभाळतात! राष्ट्रवादीने दिला पुरावा.

राज ठाकरेंच्या ‘मुन्नाभाई’ उल्लेखावर मनसेचे प्रत्युत्तर; उद्धव ठाकरेंना दिली ‘या’ कलाकाराची उपमा

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय? अनिल परब म्हणाले…

‘काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य’

मोहन भागवतांनी दिल्लीत मशिदीला दिली भेट; देशभरात चर्चांना उधाण