महाराष्ट्र मुंबई

राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

मुंबई | काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र काँग्रेसने दोन नावं जाहीर केल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? असा प्रश्न पडला होता. राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या वतीने राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाला.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि मुख्यमंत्र्यांचा आदर करत काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“शासनाने काही नियम अटी लागू करुन मंदिरं खुली करावीत”

-कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार; फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

-महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम- सुभाष देसाई

-मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!

-रिलायन्स जिओनं ‘या’ पॉप्युलर पॅकमध्ये केला मोठा बदल; रोज मिळत होता 2 जीबी डेटा