“आयुष्यभर बूस्टर डोस घेत रहायचं का?”; काॅंग्रेस खासदाराचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत निर्बंधांवरून आणि लसीकरणावरून सरकारला टीकेला सामोरं जावं लागत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतं आहे. परिणामी सरकारकडून अनेक क्षेत्रांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

सरकारनं कोरोना आकडेवारीत वाढ होत असल्याचं कारण दिलं असलं तरी मोठ्या प्रमाणात सरकारला टीकेला सामोरं जावं लागत आहे. अशातच महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या काॅंग्रेसच्या खासदारानंच टीका केली आहे.

काॅंग्रेसचे चंद्रपुरचे खासदार बाळू धानोरकर यांनी सरकारच्या कोरोना विषयक नियमावलीवर जोरदार टीका केली आहे. धानोरकर यांनी राज्य आणि केंद्र दोन्हीं सरकारवर टीका केली आहे.

दोन वर्षांच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारनं कोणत्याचं निश्चित उपाययोजना केल्या नाहीत. याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे, असं धानोरकर म्हणाले आहेत.

लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचं का?, असा सवाल धानोरकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. लवकरात लवकर निर्बंध शिथील करण्याची मागणी धानोरकर यांनी केली आहे.

सरकारनं निर्बंध लावताना नागरिकांचा विचार करणं गरजेचं आहे. निर्बंधाबाबतचा निर्णय नीट समटून घेतला पाहीजे, असं धानोरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीच्याच पक्षांमधील नेते असे सवाल उपस्थित करत असल्यानं सरकारवर विरोधक ताळमेळ नसल्याची टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

 ‘या’ गोष्टी केल्या तर कोरोना संपेल, WHO च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

 ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती