देश

तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता?; राहुल गांधी म्हणतात…

नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांवर टीका केली. यावेळी त्यांना तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता? असा प्रश्न विचारण्यात आला.

मी पंतप्रधान नाही. मात्र विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून सांगू इच्छितो की एक व्यक्ती आपलं घरदार, गाव आणि राज्य सोडून पोटापाण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातो. त्यामुळे सरकारला आता रोजगारासाठी एक राष्ट्रीय रणनीती आखावी लागेल, असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं आहे.

रस्त्यांवर चालणाऱ्या प्रवासी मजुरांना कर्जाची नाही तर पैशांची आवश्यकता आहे. सरकारने देशातील नागरिकांना सध्या सावकारासारखी नाही तर आईसारखी वागणूक द्यायला हवी, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

सर्वसामान्य, गरिब, होतकरु मजुरांसाठी सरकार, विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी मिळून काम करायला हवं. लॉकडाऊनची झळ बसलेल्या देशातीव सर्व गरिबांच्या बँक खात्यात तातडीने पैसे भरायला हवेत, असा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला.

महत्वाच्या बातम्या-

-‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

-टोमॅटोमध्ये व्हायरस शिरल्याची अफवा, विश्वास ठेवू नका!

-कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू; एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण

-आत्मनिर्भर कृषीविषयक पॅकेजच्या घोषणांवर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

-…म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी!