विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी कोणाला निवडले जाईल याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांची निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. नाना पटोले हे सर्वात ज्येष्ठ आमदार असल्याचंही थोरात म्हणाले आहेत.

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद हवं असल्याची चर्चा होत होती. मात्र, अखेर या चर्चांवर पडदा पडला असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभेत आज दुपारी 2 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीकडे 170 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वात्या बातम्या-