काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय?, पृथ्वीराज चव्हाण अचानक सोनिया गांधींच्या भेटीला

दिल्ली | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडल्यानंतर आतापर्यंत विधानसभेचं अध्यक्षपद रिकामं आहे. त्यानंतर पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना पार पडलं होतं. (Prithviraj Chavan suddenly meets Sonia Gandhi)

सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच आता हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

आवाजी मतदानाच्या आधारे ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच आता काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी दिल्लीचा दौरा केला होता. त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

अशातच आता काँग्रेसमधून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तीन नावं पुढं येताना दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव चर्चेत आहे.

नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना डच्चू मिळाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता पृथ्वीराज चव्हाण नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत आज सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. दिल्लीच्या 10 जनपथ निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना हे उर्जा मंत्रिपद देण्यात येणार असं बोललं जात आहे. यावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.ट

महत्वाच्या बातम्या- 

फुटबाॅलच्या मैदानात दुर्दैवी घटना; खेळाडू गोलकिपरला धडकला अन्…; पाहा व्हिडीओ

“वडिलांनी सांगितलंच होतं, आज काहीतरी वाईट होणार”, जग्गूदादाचा मोठा खुलासा

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण

“असं काही घडू नये, पण घडलंच तर…”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘मला संपवण्याचा कट होता, एक गाडी…’; पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप