शेतकऱ्यांना आधार द्या; आंतरराष्ट्रीय रेटिंग आपोआप सुधारेल – राहुल गांधी

नवी दिल्ली |  शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, असं मत स्पष्ट मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी व्हीडिओच्या रूपात संवाद साधला.

शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसतं पॅकेज जाहीर करून चालणार नाही तर त्यांच्या खिश्यात पैसे जायला हवेत, असं ते म्हणाले. लोकांच्या खिश्यात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारने सावकाराचं काम करू नये, अशी टीका केली.

भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असं राहुल गांधी म्हणाले.

लॉकडाऊन जास्त दिवस ठेऊन चालणार नाही. सावधगिरीने लॉकडाऊन शिथील करण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले.  तसंच शेतकरी आणि शेतमजुरांच्या खिशीत पैसे जाण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

-कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने लिहिलं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; पत्रात म्हणतो…

-…तर लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही; वाचा लग्नासाठीच्या महत्त्वाच्या सूचना

-लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही- अलाहाबाद उच्च न्यायालय

-आदित्य ठाकरेंना कुणीतरी प्रोटोकॉल सांगा, बालिश बुद्धी पुन्हा सिद्ध करून दाखवली- निलेश राणे

-LOCKDOWN- 4 : पाहा कसा असेल महाराष्ट्रातलं चौथं लॉकडाऊन…