मुंबई | मनसेचा 14 वा वर्धापनदिन आज नवी मुंबईत पार पडला. ठाकरे सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने आपलं शॅडो कॅबानेट जाहीर केलं आहे. अनेक मनसे नेत्यांनर राज ठाकरे यांनी विविध मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र मनसेच्या या शॅडो कॅबीनेटवर काँग्रेसने टीका केली आहे.
शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही, असा बोचरा वार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मनसेवर केला आहे. तसंच आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत, असा गंभीर आरोप करत तुमच्या शॅडो कॅबीनेटचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित!, असंही सावंत म्हणाले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी मनसेच्या पहिल्या फळीतील नेते आणि राज ठाकरे यांचे विश्वासू व खंदे समर्थक बाळा नांदगावकर हे नजर ठेवणार आहेत. तर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कामावर अनिल शिदोरे वॉच ठेवणार आहेत.
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर स्वत: नुकतेच राजकारणात आलेले त्यांचे भाऊ राजपुत्र अमित ठाकरे नजर ठेवणार आहेत. तर जितेंद्र आव्हाडांच्या गृहनिर्माण या खात्यावर नेते नितीन सरदेसाई यांचं लक्ष असणार आहे. एकनाख शिंदेंच्या नगरविकास खात्यावर संदीप देशपांडे जनर ठेऊन असणार आहेत.
शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो १४ वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही. आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत. त्यामुळे याचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 9, 2020
असं असेल मनसेचं शॅडो कॅबीनेट-
1. गृह, विधी व न्याय, – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजीव नाईक, राहुल बापट 2. जलसंपदा, माहिती जनसंपर्क – अनिल शिदोरे, अमित ठाकरे 3. गृहनिर्माण, वित्त नियोजन – नितीन सरदेसाई 4. महसूल, परिवहन – आदित्य शिरोडकर 5. ग्रामविकास – जयप्रकाश बावीसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर 6. वने, आपत्ती व्यवस्थापन – संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी 7. शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी 8. कामगार – राजेंद्र वाघसकर, गजानन काळे 9. नगरविकास, पर्यटन – संदिप देशपांडे, अमित ठाकरे 10. सार्वजनिक आरोग्य – रिटा गुप्ता 11. अन्न नागरी पुरवठा – राजा चौगुले, विशाल पिंगळे 12. महिला व बालविकास – शालिनी ठाकरे 13. सार्वजनिक बांधकाम – संजय शिरोडकर 14. सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर
महत्त्वाच्या बातम्या-
-चिकन खाल्याने कोरोना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे
-10×10 च्या खोलीत बालपण घालवलेल्या नेहा कक्करने खरेदी केला आलिशान बंगला!
-कोरोनामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; इम्तियाज जलील यांची मागणी
-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो ‘हँडशेक’नंतर आता सभाही रद्द; पवारांचा खबरदारीचा उपाय