…त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना पैसा द्यावाच लागणार; चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली | लॉकडाउनच्या कालावधीत पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता. 16 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी पहिल्यांदा 60 पैशाची वाढ करण्यात आली होती.

इंधनाच्या दरवाढीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

इंधनाच्या विक्रीची किंमत दोन दिवसात दोन वेळा वाढली. दोन आठवड्यांपूर्वी यावरील करात वाढ करण्यात आली. यावेळी कंपन्यांच्या फायद्यासाठी वाढ करण्यात आली, असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.

सरकार गरीब आहे, त्यांना अधिक कराची आवश्यकता आहे. इंधन कंपन्या गरीब आहेत. त्यांना चांगल्या दराची आवश्यकता आहे. पण गरीब आणि मध्यमवर्ग हा गरीब नाही, त्यामुळे त्यांना पैसे द्यावे लागतील, असंही पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

-शेतकऱ्यांसाठी कृषितज्ज्ञांनी दिला ‘हा’ अत्यंत महत्त्वाचा सल्ला

-“… तर मी स्वत: सामनाच्या कार्यालयात येऊन पाया पडायला तयार आहे”

-“सोनू आम्हाला माफ कर, आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरलेली नाही”

-कोरोना संसर्गाबाबत चीनने केला मोठा खुलासा