जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई | काँग्रेस पक्ष हा केवळ सत्तेसाठी लाचार झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेसच्या नेत्यांना निर्णय घेण्याचाच अधिकार नसेल तर मग जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेतून पडा, अशी घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्याला सद्यस्थितीला शिवसेना, राष्ट्रवादी इतकाच काँग्रेस पक्षही जबाबदार आहे. राहुल गांधींनी हे वक्तव्य करून अत्यंत दुटप्पी भूमिका घेली आहे. काँग्रेस दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत आहे, असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.

सत्तेत राहून फायदा तेवढा कमवण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. कोरोनामुळे लोकं संकटात असताना राज्यातले मंत्री मात्र गायब आहेत, असं म्हणत विखेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना हे सरकार फक्त फेसबुकवरच चालणार का ?असा सवाल विखे-पाटलांनी उपस्थित केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

-कामगारांचा पोटाचा प्रश्न सोडवण्याठी बीग बी अमिताभ बच्चन यांचा पुढाकार

-“आकडे जेवढे वाढतील, तेवढं लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ; विरोधकांना सत्ता नसल्याने अपचन”

-देशात 64, 425 रूग्ण ठणठणीत होऊन घरी मात्र रूग्णवाढीचा आकडा चिंताजनक

-अगोदर लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं, राजकारणाला भरपूर वेळ पडलाय- आदित्य ठाकरे