मुंबई| मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दिल्याचा गौप्यस्फोट पत्राद्वारे केल्यानंतर संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार चांगलच गोत्यात आलं आहे. अशात आता मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनीदेखील याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खरे असल्यास काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून घ्यायला हवं, अशी मागणी लक्ष्मण सिंह यांनी केली आहे.
लक्ष्मण सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री मुंबई पोलिसांकडून जर 100 कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणं वसूल करत असतील आणि जर हे सत्य असेल तर देशमुख देशाचे मुख होऊ शकत नाहीत. असं दिसत आहे, की आघाडी सरकार पिछाडीवर जात आहे. काँग्रेसनं आपलं समर्थन माघारी घ्यायला हवं.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद थेट या पत्रात दिला आहे. तारीख आणि वेळेसहित हा संवाद असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे मोठे स्फोट होत आहेत. यासंदर्भात रविवारी रात्री दिल्लीतील 6 जनपथ येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बैठकीला हजर होते. तर, संजय राऊत यांच्याशीही चर्चा झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…
जुलियो रिबेरोंनी शरद पवारांचा ‘हा’ प्रस्ताव…
सेकंड हँड कार घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या…
गृहमंञी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल शरद पवारांचा मोठा…