मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या तब्बल 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीकडून झालेल्या त्या अपमानाचा बदला घेणार आहे.
मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे तब्बल 24 नगरसेवक आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी वाद आता पेटताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मालेगावात काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्याचाच वचपा काँग्रेसने काढला आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे तब्बल 24 नगरसेवक आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ही मोठी उलथापालथ असल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 24 नगरसेवक घड्याळाला रामराम करत काँग्रेसचा हात हातात घेण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये झालेल्या अपमानाचा काँग्रेसकडून बदला घेतला जातोय.
दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला होता.
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सर्वच्या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. सर्वच्या सर्व काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा झटका मानला जात होता.
दरम्यान, राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका (Maharashtra Municipal Elections 2022) जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कंबर कसताना दिसत आहे.
प्रत्येक पक्षाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरु आहे. पण ही तयारी सुरु असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांचंच एकमेकांसोबत राजकीय युद्ध सुरुच असल्याचं चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये, धक्कादायक माहिती समोर
कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढलं
कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
भारतीय गोलंदाजांवर पैशांचा पाऊस; वाचा कोणत्या गोलंदाजाला मिळाली किती रक्कम
मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल