‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

मुंबई | सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नसल्याने ही नाराजी असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज महाराष्ट्र काँग्रेसची बैठक झाली. या बैठीकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी झालेल्या या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील हे उपस्थित होते.

आमचे काही प्रश्न आहेत. हे तीन पक्षांचे सरकार आहे. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेणे अपेक्षित आहे. आम्ही त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

-लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

-“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”

-भारतात या 8 औषधांच्या वापराने बरे झालेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

-शरद पवारांचा ‘तो’ दावा विनोद तावडेंनी खोडून काढला, म्हणाले…