नागपूर महाराष्ट्र

“विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल”

वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’चा आज दुसरा दिवस आहे. यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. वर्ध्यातील महाजनादेश यात्रेत त्यांनी हा दावा केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत वर्ध्यातील चारही जागा भाजप जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने केलेल्या कामांचा पुरावा मुख्यमंत्र्यांनी दिला.

आमच्या जनादेश यात्रेला लोकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो, हा प्रतिसाद म्हणजे केलेल्या कामांची पावती आहे. त्यामुळं जर तुम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत महाजनादेश दिला तर आम्ही तुम्हाला महाविकास देऊ, असे आश्वासन त्यांनी वर्ध्यातील जनतेला दिले. 

समृद्धी महामार्गामुळे विकासाचा मार्ग खुला होऊन या भागात विकास होईल. वर्ध्यातील 45 हजार लोकांची कर्ज आणखी माफ करायची बाकी आहेत. त्याची प्रक्रिया सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेवटचा शेतकरी कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता आमचं सरकार असून गेल्या पाच वर्षात अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आमचं काम अशाच पद्धतीने सुरु राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.  

महत्वाच्या बातम्या-

-शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??; मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राष्ट्रवादी!

-मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही- राज ठाकरे

-“220 जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला का घाबरता??”

-“भाजप-सेनेची यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी मात्र राष्ट्रवादीची रयतेच्या बुलंद आवाजासाठी”

-उदयनराजेंना ‘शिवस्वराज्य यात्रे’ची कल्पनाच नाही???

IMPIMP