मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे प्रचार प्रमुख व शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडले.
संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नितेश राणेंचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नाही. या प्रकरणापासून अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला आहे.
कणकवली सत्र न्यायालयाने नितेश राणेंना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मंगळवारी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली.
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत नितेश राणेंवर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारने यावेळी उच्च न्यायालयात दिली आहे.
राज्य सरकारने कठोर कारवाई न करण्याची हमी दिल्याने नितेश राणेंना तुर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणे असल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे.
नितेश राणेच या प्राणघातक हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा दावा पोलीसांनी न्यायालयात केला. हे आरोप सिद्ध करणारे तपशीलवार प्रतिज्ञापत्र सादर करत पोलीसांनी न्यायालयात ही माहिती दिली आहे.
नितेश राणे आमदार आहेत त्यामुळे याचिकेवरील सुनावणी सुरू असेपर्यंत त्यांना कठोर कारवाईपासून संरक्षण मिळायला हवे, अशी मागणी नितेश राणेंच्या वकीलांनी न्यायालयात केली.
दरम्यान, नितेश राणे यांच्यावर अपमानास्पद कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती देखील नितेश राणेंच्या वकीलांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली आहे.
पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची तोंडी हमी विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी न्यायालयाला दिली. राज्य सराकरच्या या निर्णयामुळे नितेश राणेंना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अनिल परब केंद्राच्या रडावर, लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई
इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न; ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू
दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
मार्केट अपडेट: शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी, निफ्टी 17,700 पार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोनाच्या विळख्यात, ट्विट करत दिली माहिती