“मला संपवण्यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचून हल्ला केला”

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या भाजप नेते आमदार गोपिचंद पडळकर प्रचंड गाजत आहेत. राज्यात चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये जोरदार वाद रंगला आहे.

आमदार गोपिचंद पडळकर यांनी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत या संपात सहभागी असल्याचं जाहीर केल आहे. इतकच नाही तर सरकारच्या विरोधात आंदोलन उभं करण्यासाठी कंबर कसली आहे.

महाविकास आघाडीविरोधात आवाज उठवल्यानं मला संपवण्यासाठी सरकारकडून षडयंत्र केलं जात आहे, असा आरोप राज्य सरकारवर भाजप आमदार पडळकर यानी केल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी गोपिचंद पडळकर यांनी जोरदार मोर्चाबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील झरी या ठिकाणी पडळकर समर्थक आणि राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

आटपाडी या ठिकाणी आपल्यावर वरिष्ठ पातळीवर नियोजन करून हल्ला करण्यात आल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. आटपाडी झरे या ठिकाणी पडळकरांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.

गोपिचंद पडळकर सातत्यानं महाविकास आघाडीवर जहरी टीका करताना पाहायला मिळतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून सध्या पडळकर सत्तधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत.

रविवारी पडळकर समर्थक आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहे. राज्य सरकारनं पडळकर यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी भाजपनं केली आहे.

आटपाडी येथील मारहाणीबद्दल आमदार गोपिचंद पडळकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिणामी भाजपनं सरकारवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

मी वारंवार महाविकास आघाडीच्या विरोधात आवाज उठवत आहे. परिणामी माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे, अशी टीका पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

दरम्यान, राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपकडून पाठिंबा मिळाला आहे. सरकारमध्ये विलीनिकरण करण्यासाठी हजारो कर्मचारी संपावर गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा” 

येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा