Top news आरोग्य देश

लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसताच डाॅक्टरांचा सल्ला घ्या, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

children e1641983521609
Photo Credit - Pixabay

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सगळ्यांनाच हैराण करुन सोडलं आहे. गेल्या दोन वर्षापासून आपण या महामारीचा सामना करत आहोत. मात्र कोरोना काही संपायचं नाव घेईना. अशातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं कहर माजवला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा नवीन व्हेरियंट समोर येत आहे. या व्हेरियंटनं नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पाडली आहे. नुकताच आलेला ओमिक्राॅन व्हेरियंटचा संसर्ग रोज वाढत चालेला पहायला मिळत आहे.

कोरोनाचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे पालकांनी मुलांवर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे, असं तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जातं.

लहान मुलांच्या लक्षणांकडे बारकाईनं लक्ष दिल्यास कोरोना संसर्ग झाला की नाही हे लगेच समजेल. त्यामुळे पालकांनीही मुलांकडे नीट लक्ष देऊन त्याच्यांत जराही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लहान मुलांमध्ये कोरोनाची ताप, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे ही लक्षण आढळतात. तर ओमिक्रॉनची नाक वाहणे, घसा दुखणे, अंग दुखणे, कोरडा खोकला आणि ताप यांसारखी लक्षणे आढळतात. जर मुलांमध्ये ही लक्षणं आढलली तर पालकांनी वेळीच सावध झालं पाहिजे.

हान मुलांना कोरोना आणि ओमिक्रॉनपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखलं पाहिजे. घरातून बाहेर जाताना मास्क लावायला सांगितले पाहिजे.

सध्या पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी चिंतेत आहेत. जरी अनेक शहरातील शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी मुलांना अजूनही कोरोनाच्या संसर्गाची भीती आहे. त्यामुळे हलकीशी लक्षणं आढळली तरी लगेच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण आता या संकटातून बाहेर काढण्याचं एकमेव शस्त्र असल्याचं पहायला मिळतंय

दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना आता बूस्टर डोस दिला जाणार आहे. राज्य सरकारनं आता बूस्टर डोस देण्यास परावाणगी दिली आहे. ज्या लसीचे पहिले दोन डोस घेतले आहेत त्याच लसीचा तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती