दीर्घकाळ दिसतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं; वेळीच घ्या डाॅक्टरांचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता प्रभाव सर्वांसाठीच धोकादायक आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळं अनेकांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत. अशातही आणखीन कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही.

जागतिक स्तरावर गेल्या एका महिन्यापासून कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ नोंदवली गेली आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाल्यानं आता अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.

कोरोना या रोगाची काही लक्षणं आहेत जी जाणवत असल्यास तात्काळ डाॅक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण जास्त दिवस जर काहीच उपचार घेतले नाहीत तर धोका वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड वर्षापासून चालू असणाऱ्या या कोरोनानं अनेकांना आपल्या तावडीच घेतलं आहे. कोरोना झालेल्यांना आणि कोरोनाची सौम्य लक्षणं दिसणाऱ्यांना काळजी घेणं गरजेचं आहे.

काही लक्षणं ही जास्त प्रमाणात शरीरात पसरत नाहीत पण हळूहळू रोगप्रतिकारकशक्ती कमी करायला लागतात. परिणामी डाॅक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील काही रूग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. वयोवृद्ध आणि आजारी माणसांमध्ये हा प्रकार जास्त पहायला मिळतो.

काही युवकांमध्ये देखील लाॅंग कोविडची लक्षणं दिसायला लागली आहेत. थकवा येणं, सतत सर्दी होणं, खोकताना त्रास जाणवणं, इत्यादी लक्षणं आहेत. अशावेळी जास्तीत जास्त जेवण करणं आणि आराम करणं हा पर्याय आहे.

तोंडाला कसल्याही जेवण्याची चव येत नाही, वास ओळखायला येत नाही, अशी लक्षणं देखील या लाॅंग कोरोनाचा एक भाग आहेत. परिणामी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

दरम्यान, कोरोनासदृश्य लक्षणं जाणवत असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेऊन घरीही उपचार करता येतात. सध्या अशा रूग्णांची संख्या वाढत असल्याचं संशोधनात स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

उर्फीचा अनोखा अंदाज! नेटकरी म्हणाले, “आधी नशा करणं बंद कर”

 मुख्यध्यापकाच्या ऑफिसमध्ये राडा, बोलता बोलता झालं असं की…; पाहा व्हिडीओ

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!