गोड बातमी! मुंबईतील कोरोना संक्रमण नियंत्रणात येत आहे; कोविड सेंटरमधील तब्बल इतक्या हजार खाटा रिकाम्या

मुंबई|  गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रसारामुळे मुंबई हादरली होती. वाढत्या रुग्णांची संख्या पाहून पालिका रुग्णालयात जागा कमी पडू लागल्या होत्या. मे मधली स्तिथी बघता रुग्णांची संख्या लाखाच्यावर गेली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेने 403 छोटे मोठे कोरोना केअर सेंटर उभारले होते. यामध्ये एकूण 73 हजार खाट उपलब्ध केल्या होत्या मात्र काही दिवसांन पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होऊ लागला असून रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

मुंबईत 19 हजार सक्रिय रुग्णांंपैकी पाच हजार 426 रुग्ण कोरोना सेंटर मध्ये उपचार घेत आहेत त्यामुळे एकूण 73 हजार खाटांंपैकी 67 हजार खाटा रिकाम्या झाल्या आहेत. छोटी केंद्रे बंद केले असून मोठी केंद्रे काही काळ चालू राहतील.

बांद्रा कुर्ला संकुल, गोरेगाव नेस्को, ‘एनएससीआय’ वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, दहिसर या ठिकाणचे जम्बो हेल्थ सेंटर सुरू राहणार आहे. मात्र कॉलेज, शाळा , इमारती मध्ये असलेले केंद्र हळूहळू बंद करण्यात येणार आहे.

‘कोरोना सेंटर 1’ मध्ये जे व्यक्ती संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी असून त्याची संख्या तीनशे आहे. खाटांची क्षमता पाच हजार असून चार हजार रुग्णांवर उपचार चालू आहे. ‘कोरोना सेंटर 2’ मध्ये बाधित आणि लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तेथील खाटांची  क्षमता 25 हजार असून 1424 रुग्णांवत उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तपासात गडबड करू शकतात”

पार्थच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही; शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारलं

वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य सरकार आज घेणार महत्वाची भूमिका

सतत गोड खाताय?; वेळीच व्हा सावधान नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ वाईट परिणाम!

सावधान! ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉल करताय?; एकदा ही माहिती वाचा अन्यथा खिशाला लागू शकते कात्री!