बंगळूर | स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कर्नाटकातील शिवमोगा (Shivmoga) येथे अमीर अहमद सर्कल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे फलक लावण्यात आले होते.
त्या फलकावरुन या परिसरात दोन गटात वाद झाले आहेत. या वादाचे रुपांतर भांडणात झाले होते. या ठिकाणी वादाच्या काही तासानंतर प्रेमसिंग (Premsingh) नावाच्या एका व्यक्तीवर गांधी बाजारात चाकूने हल्ला करण्यात आला होता.
प्रेमसिंग हा गंभीर जखमी झाला असून त्यानंतर त्याठिकाणच्या वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या हल्ल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांची ओळख पटली आहे.
नदीम (Nadeem) (वय 25) आणि अब्दुल रहमान (Abdul Raheman) (25) अशा या व्यक्तींची नावे आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा वाद झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेनुसार 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा या परिसरात तैनात केला आहे.
तसेच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथील जिल्हाधिकारी आर. सेल्वामणी (R. Selvamani) यांनी शिवमोगा शहर तसेच भद्रावाती शहरात शाळांना मंगळवार (दि. 16 ऑगस्ट) रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
“स्वतंत्र्य भारतात जन्माला आलेला मी पहिला…” – नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन संपन्न
शिवसेनाभवन बांधण्यावरुन शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा दणका
“त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, अजित पवारांची संख्याबळाच्या मुद्यावर भविष्यवाणी