Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यामुळे आरोह वेलणकर आणि महेश टिळेकर भिडले, एकमेकांवर टीका करत म्हणाले…

मुंबई| माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्या फक्त राजकारणताच नाही तर त्यांच्या गाण्यामुळे देखील चर्चेत असतात. त्यांची आत्तापर्यंत अनेक गाणी रिलीज झाली आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेलं त्यांच गाणं चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

‘तिला जगू दया’ हे नवीन मराठी गाणे युट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. बहुतेक श्रोत्यांनी हे गाणं डीसलाईक केलं आहे. भाऊबिजीच्या दुसऱ्याच दिवशी रिलीज झालेल हे गाणे टी-सिरीज मराठीने लाँच केले आहे.

महिला सक्षमीकरणावर हे गाणे आधारित आहे. परंतु लोकांना हे गाणे जास्त आवडलं नाही. या गाण्याला चाहत्यांनी लाईकही खुप कमी केलेल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी या गाण्याची तुलना ढींचाक पूजाच्या गाण्यांशी केली आहे. या गाण्याबद्दल लोक यूट्यूब आणि सोशल मीडियावरही वाईट प्रतिक्रिया देत आहेत.

अमृता फडणवीस यांच्या गाण्याची तूलना गाई, म्हशीच्या हंबरण्याशी करणारे निर्माते महेश टिळेकर यांच्यावर आता अभिनेता आरोह वेलनकर यांनी टिका केली आहे.

जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होत आहे. लाखो तरुणांच्या हृदयात धडकी भरते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?, असा प्रश्न टिळेकर यांनी केला होता.

टिळेकरांच्या टीकेला उत्तर देतना आरोह म्हणाला, तुम्ही केलेली टीका वाचून लाज वाटली. प्रसिद्धीसाठी करत असाल तर हे अधिकच हीन आहे. जरा सुधरा. तुमच्या मराठी तारका कार्यक्रमात कोण काम करतंय बघू, असा इशाराही त्यानं टिळेकर यांना दिला होता. टिळेकर यांनी देखील आरोहला कडवट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

बेसूर गाणाऱ्या स्वयंघोषित गायिकेवर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकीवजा संदेश देतोस. तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं? कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार?, असं टिळेकर म्हणाले आहेत.

तसेच आधी स्वत:चे करिअर बघ. फूटेज आणि पब्लिसिटी मिळवण्यासाठीच तू बिग बॉस मध्ये गेला होतास ना? का तिथे समाजसेवा करायला गेला होतास? तुझे समविचारी आहेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का?, असा प्रश्नही टिळेकर यांनी केला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यामुळे अनेक स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक लोक या गाण्यावर कमेंट करत अमृता यांची खिल्ली उडवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून आमीर खान अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा! कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

‘या’ बड्या अभिनेत्रीवर आधी चाकूने ह.ल्ला आता जीवे मा.रण्याची धमकी, अभिनेत्रीची मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी साद

मोठी बातमी! कॉमेडीयन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष ‘या’ प्रकरणी गजाआड

काय सांगता! जगातील एकाही शाकाहारी व्यक्तीला कोरोना झाला नाही?

धक्कादायक! ‘त्या’ मृ.त्यू प्रकरणात राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे नेते सामील आहेत?