वादग्रस्त ठरलेले मंत्रीही शिंदेंच्या मंत्रिमंडळात, ‘हे’ गंभीर आरोपही झाले होते

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी संपन्न झाला. यावेळी शिंदे गटाच्या नऊ आणि भाजपच्या नऊ अशा महाराष्ट्राच्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतली.

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात वादग्रस्त ठरलेल्या आणि एका तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप झालेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी देखील शपथ घेतली.

तसेच काल (दि. 08) रोजी टीईटी घोटाळा (TET Scam) प्रकरणात ज्यांच्या मुलींची नावे आली आहेत, असे टीईटी घोटाळ्याचे आरोप झालेेले शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील आज शपथ घेतली.

पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांचे हे प्रकरण फार गाजले होते. भाजपने त्यांच्याविरोधात मोठा लढा देत त्यांना मंत्रिपदावरुन खाली खेचले होते.

तसेच अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली टीईटीमध्ये अपात्र असून देखील गेली पाच वर्षे त्यांच्या एका मुलीला शासनाचे वेतन मिळत होते. त्यामुळे कालच ते प्रकाशझोतात आले होते.

आज सकाळ पर्यंत या दोन बंडोबांना संधी मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तरी देखील त्यांना मंत्रिपदे मिळाली. राठोड यांच्याविरोधात चित्रा वाघ (Chitra Wagh) आक्रमक झाल्या आहेत.

त्यांना मंत्रिपद मिळणे म्हणजे दुर्दैव आहे, असे वाघ म्हणाल्या तर त्यांच्या विरोधात सुरु असलेला लढा आपण कायम देऊ असे देखिल चित्रा वाघ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यासोबत आणखी सात आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दीपक केसरकर, दादा भुसे, उदय सामंत, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, शंभुराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.

महत्वाच्या बातम्या –

एकीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तर दुसरीकडे विनायक राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं

टीईटी घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर!

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, वाचा कुणाला संधी मिळणार