‘अनुराधा’ वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात; रुपाली चाकणकर म्हणतात…

मुंबई | राज्यातील महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीनं आणि सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य महिला आयोगाचं कार्य हे महत्त्वपुर्ण मानलं जातं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सुत्र हातात घेतल्यापासून दमदार काम करायला सुरूवात केली आहे.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सातत्यानं चाकणकर या विविध माध्यमातून सक्रिय असल्याचं पहायला मिळत आहे. आताही चाकणकर यांनी अनुराधा या नवीन वेबसिरीजच्या बाबतीत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

तेजस्विनी पंडीत मुख्य भूमिकेत असलेल्या आणि प्लॅनेट निर्मीत अनुराधा या वेबसिरीजचे पोस्टर पुणे शहरात लावण्यात आले आहेत.  या पोस्टरवर तेजस्विनी पंडीत अर्धनग्न अवस्थेत हातात सिगारेट घेऊन दिसत आहे. यावरून जोरदार वाद रंगला आहे.

काही दिवसांपुर्वी सर्वत्र माझं लिपीस्टीकला समर्थन अशा आशयाच्या पोस्ट टाकल्या जात होत्या. त्या पोस्ट्स या विविध अभिनेत्रींकडून करण्यात आल्या होत्या. त्या पोस्टदेखील याच अनुराधा या वेबसिरीजचा एक भाग होत्या.

आता याच अनुराधा पोस्टरवरून जोरादर वाद रंगला आहे. पुण्यातील काही महिलांनी आणि वकिलांनी याबाबत महिला आयोगाकडं तक्रार केली आहे. परिणामी याची चर्चा सध्या जोरदार होत आहे.

अनुराधा सिरीजचे पोस्टर ट्विट करत अॅड जयश्री पालवे यांनी तक्रार केली आहे. हे पोस्टर सध्या सगळीकडे पहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंद असताना यामध्ये एका महिलेने अंगप्रदर्शन करीत हातात पेटती सिगारेट घेतली आहे, परिणामी सध्या या ट्विटची चर्चा आहे.

महिलेचे असे ओंगळवाने प्रदर्शन करणे योग्य आहे का? राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी, असं पालवे म्हणाल्या आहेत. त्यांनतर लगेच रूपाली चाकणकर यांनी याबाबत कारवाईची मागणी केली आहे.

अनुराधाचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पत्र पाठवत चाकणकर यांनी लवकर ही चुक दुरूस्त करण्याची मागणी केली आहे. परिणामी आता राज्यात हा पोस्टर वाद सुरू झाला आहे.

रूपाली चाकणकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून या अशा जाहिरातीच्या माध्यमातून स्त्रियांचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे आणि व्यसनाधीनतेसाठी समाज प्रोत्साहित होईल अशा गोष्टींवर अंकुश लागणे गरजेचं आहे, असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव

नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे

“म्याव म्याव करणारे लपून बसलेत, गुन्हेगार लोक नेहमीच…”

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”