मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणाऱ्या ‘त्या’ पोस्टरवरुन भाजपविरोधात संताप

अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर ‘देवांचा राजा इंद्र; महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’, अशा मजकुराचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी भाजपाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेसाठी शुभेच्छा देणारे पोस्टर अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणाऱ्या या पोस्टरवर ‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे एकमेव राजे आहेत, असं अनेकांनी ठणकावून सांगितलं आहे.

स्थानिक रहिवासी हेमंत मुळ्ये या ट्विटर युजरने सर्वप्रथम ही बाब निदर्शनास आणून दिली. रस्त्यावर अशाप्रकारचे पोस्टर दिसल्यानंतर मुळ्ये यांनी तो फोटो शेअर करत मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजप यांना ट्विटरद्वारे टॅग केलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी केली.

महाराष्ट्राचा राजा एकच…छत्रपती शिवाजी महाराज असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. आपल्या ट्विटसोबत त्यांनी अहमदनगर पोलिसांनाही टॅग केलं होतं. मुळ्ये यांचं ट्विट आणि पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरूवात झालीये. विरोधकांसह नेटकऱ्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, ट्विट व्हायरल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ते पोस्टर हटवलं आहे. पोस्टर हटवल्यानंतर, अखेर तो बॅनर हटवला…बॅनर काढल्याबद्दल धन्यवाद…भविष्यात कुठल्याही राजकीय पक्षांनी राजा शिवछत्रपतींशी तुलना करू नये ही नम्र विनंती, असं ट्विट मुळ्ये यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शोएब अख्तरचे स्मिथबाबत ट्वीट; त्यावर युवराज म्हणतो…

-‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही; संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा

-“महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारं भाजप स्वतःच राष्ट्रवादी’युक्त’ झालंय”

-मनसेची आज बैठक; ईडीविरोधात आंदोलनाच्या तयारीत!