संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर

मुंबई | कोरोनाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने भविष्यात येणारी आव्हानं लक्षात घेता वानखेडे स्टेडिअम क्वारंटाइनसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करताना ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात घेतलं जावं अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या मागणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर केला पाहिजे. क्वारंटाइन सुविधेसाठी वानखेडे मैदान ताब्यात घेण्याचा निर्णय योग्य आहे. ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात का घेतलं जाऊ नये ? तिथेही योग्य सुविधा उपलब्ध आहेत. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केलं होतं. आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मागणीला विरोध करत ट्विटरवरुन उत्तर दिलं.

आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-निर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधींना हात जोडून केली विनंती, म्हणाल्या…

-महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे

-पृथ्वीराज बाबांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाण्यापासून कोण रोखतंय बघतेच- तृप्ती देसाई

-ग्रीन झोन असलेल्या बीडमध्ये कोरोनाचा शिरकाव; पाहा कोरोना कुठून कसा आला…

-कुणी 5 कोटी दिलेत, कुणी 500 कोटी… आम्ही आमचं आयुष्य देतोय; मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट