Top news आरोग्य कोरोना

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी

corona 2 e1641026902498
Photo Credit-pixabay

मुंबई | कोरोना (Corona) हळूहळू आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच देशातील कोरोना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने आता राज्याने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले आहे. त्यातचबरोबर मास्क घालणं देखील ऐच्छिक केलं आहे. अशातच आजची कोरोना आकडेवारी समोर आली आहे.

आज देखील सक्रिय रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 911 सक्रिय रुग्ण आहे. आज राज्यात 123 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 94, 20, 815 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

दरम्यान, कोरोना रूग्णसंख्या कमी होत असली आणि सरकारने निर्बंध हटवले असले तरी आता मास्कचा वापर करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्याचा कार्यक्रम होणार?

Anil Parab: “आता पुढचा नंबर अनिल परबांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी”

Russia-Ukraine War: युद्धात मोठी घडामोड; ‘या’ शहरातून रशियन सैन्य अचानक माघारी फिरलं

“राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका, मातोश्रीवर कॅमेरे लागतील…”

Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर