Top news आरोग्य कोरोना देश

संसदेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

parliment

नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिल्लीत कोरोनाचा हाहाकार सुरू असताना आता संसदेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

संसदेत कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. संसदेतील तब्बल 400 पेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संसदेत इतके जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने धाकधूक वाढली आहे.

6 आणि 7 जानेवारी रोजी संसदेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी संसदेतील 400हूनही अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

देशात कोरोनाचा सर्वात जास्त संसर्ग महाराष्ट्रात झाला आहे. तर कोरोना संसर्गात देशात राजधानी दिल्लीचा दुसरा नंबर आहे. त्यात संसदेतील 400 पेक्षाही जास्त कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने धाकधूक वाढली आहे.

दिल्लीत सध्या 48 हजार 178 सक्रिय कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दिल्लीतही निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 41 हजार 986 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 11 दिवसांत देशातील कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत तब्बल 21 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोरोनाची वाढती आकडेवारी बघता देशातील अनेक भागात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादायला सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

सेक्स रॅकेटमध्ये अटक झालेल्या थायलंडच्या तरूणींचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘जेंडर चेन्ज करून’

…म्हणून गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण -एकनाथ खडसे

Corona | कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ‘या’ गोष्टी सर्वात आधी करा