राज्यात कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाला रोकण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 8 हजार 068 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ख्रिसमस, 31st आणि नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे आता राज्य सरकारने गर्दी न करत घरीच कार्यक्रम साजरे करण्याचं आवाहन केलं आहे.

आतापर्यंत 454 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन देखील झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय. राज्यात आज ओमिक्रॉनचे 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान,राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गुरूवारी रात्री उशिरा नवी नियमावली जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

आता थांबायचं नाय! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

भिर्रर्र चा नाद घुमणार! ‘या’ ठिकाणी पार पडणार अधिकृत बैलगाडा शर्यत

 “अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय…”, सोनम कपूरची मुनगंटीवारांवर जोरदार टीका

 चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल