Top news कोरोना विदेश

कोरोनामुळे नपुंसकत्व येवू शकतं; संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या महामा.रीमुळे लोकांचं जीवन जणू एकाच जागी थांबलं आहे. जगतील कित्येक देश या महामा.रीवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप कोरोनावरील लस तयार होऊ शकली नाही. संपूर्ण जगातील लोकांचं कोरोनाच्या लसीवरच लक्ष लागून आहे.

जगातील अनेक संशोधक कोरोनावर संशोधन करत आहेत. कोरोनाचे फायदे तोटे अशा अनेक गोष्टी संशोधनातून समोर येत आहेत. अशातच आता इस्त्राईल मधील डॉक्टरांचा कोरोनावरील संशोधनाचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनं कोरोनाविषयी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.

जर कोणता पुरुष कोरोनामुळे गंभीर आजारी असेल तर त्या पुरुषाला नपुंसकत्व येवू शकतं, असं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. इस्त्राईल मधील शेबा मेडिकल सेंटरचे डॉ. डेन अॅडेरका यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं आहे.

डॉ. डेन अॅडेरका यांच्या टीमनं याप्रकरणी संशोधन करण्यासाठी काही कोरोनाबाधित पुरूषांची चाचणी केली आहे. कोरोनाबाधित झालेल्या पुरुषांचे शुक्राणू तपसण्यात आले. त्यावेळी काही पुरुषांमधील शुक्राणू कोरोनाच्या विषाणूमुळे संक्रमित झाल्याचे आढळले.

कोरोना विषाणूनं शरीरातील शुक्राणूवर डायरेक्ट हल्ला चढवल्यानं विर्यातील शुक्राणूचं प्रमाण कमी झाल्याचं संशोधकांना आढळलं. तसेच कोरोनाबाधित पुरुषांमधील शुक्राणूंचं प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त घटत आहे, असंही संशोधनादरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आलं आहे. विर्यातील शुक्राणूंवर कोरोनानं हल्ला केल्यानं नपुंसकत्वाचा धोका निर्माण होवू शकतो, असं शेबा मेडिकलनं संशोधनाच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे.

कोरोनाच्या विषाणूमुळे शुक्राणूवर होणारा परिणाम शरीरावर दीर्घकाळ राहतो. मात्र, शरीरात याचे परिणाम नेमके कधीपर्यंत राहतात याच्यावर आणखी अभ्यास करणं गरजेचं आहे, असं डॉ. डेन अॅडेरका यांनी म्हटलं आहे.

तसेच कोरोना व्हायरस टेस्टीकलमधील दोन महत्वाच्या पेशींवरही हल्ला करतो, असंही संशोधनादरम्यान आढळून आल्याचं डॉ. डेन अॅडेरका यांनी सांगितलं आहे. शेबा मेडीकल सेंटरच्या अगोदरही एका मेडिकल टीमनं कोरोनामुळे नपुंसकत्व येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, डॉ. डेन अॅडेरका आणि त्यांची टीम कोरोनाबाधित रुग्णांची सहा महिने आणि वर्षभरानंतर पुन्हा तपासणी करणार आहे. यावेळी त्यांच्या शरीरात काय बदल होतात, याचाही या टीमद्वारे अभ्यास केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे होते टार्गेटवर, स्टडी रिपोर्टचा धक्कादायक खुलासा!

सुशांत सिंह राजपूतनं आ त्मह.त्याच केली हे कशावरून? एम्सच्या टीमनं दिलं स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार

नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा निर्णय