भारतात कोरोनामुळे गेल्या चार दिवसात झालेल्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक

नवी दिल्ली | कोरोना जगभरात थैमान घालत असताना तो भारतासाठी देखील डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे. भारतात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना गेल्या चार दिवसांत झालेल्या मृत्यूची आकडेवारी देखील धक्कादायक आहे.

गेल्या चार दिवसात भारतात ९११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १००० जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते.मात्र गेल्या चारच दिवसात तब्बल एवढ्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुनच ही बाब समोर आली आहे. यावरुन भारतात करोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणात नसल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही भारतात झपाट्याने वाढ होत आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचण्यासाठी ८७ दिवस लागले होते. २६ एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ एमआयडीसीमध्ये हजारोंना रोजगारांची संधी; उद्योगमंत्र्यांनी दिली खुशखबर

-अमेरिकेनंतर आता ‘हा’ देश ठरतोय कोरोनाचं नवं हॉटस्पॉट; अक्षरशः थैमान सुरु

-रायगडच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताच मुख्यमंत्र्यांची लगोलग 100 कोटींची घोषणा

-“फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला”

-पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांनी केलं राजभवन येथे वृक्षारोपण