‘पैसा आणि ओळख यांना कोरोना ओळखत नाही’ फुलवा खामकरनं सांगितला कोरोनाचा अनुभ

मुंबई| देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेक योद्ध्यांना कोरोनानं ग्रासलं देखील. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्राण देखील गमावले आहेत.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिने सोशल मिडियावर आपल्यााला आलेला कोरोनाचा भयाण अनुभव सांगितला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत असून कोरोनाची ही दुसरी लाट खूपच वेगाने आणि गेल्या वर्षीपेक्षा अधिक शक्तिशाली बनून आली आहे, असे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

करोना घरापर्यंत आला…आम्हाला मागच्या वर्षी झाला तेव्हा त्याची झळ पोहचली नव्हती ती आत्ता जास्त प्रकर्षाने जाणवली…माझा अत्यंत लाडका छोटा काका जेव्हा व्हेंटिलेटर गेला तेव्हा…..

आता कोणी ऐकणार नाहीये, करोना ची काय भीती ठेवायची आता? जगण्या साठी काम तर केलंच पाहिजे ना?बघा कसं सगळं नॉर्मल चाललं आहे बाहेर…हो हो मी पण क्लासेस घेते आहे ना…..इथे सगळं ओ के आहे असं माझ्या म्यांचेस्टर इथे राहणाऱ्या डॉक्टर बहिणीला बोलणारी मी…. आणि माझ्यासारखे अनेक!!!

माझा हा सगळा आव आता गळून पडला आहे…. हवं ते हॉस्पिटल सोडा पण आपल्याला साधा बेड मिळत नाही म्हणजे काय, टीव्ही वर जे सतत सांगत आहेत की ऑक्सिजन बेड सुद्धा उपलब्ध नाहीये म्हणजे काय, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणजे काय हे सत्य खाडकन थोबाडीत मारल्यासारख समोर उभं राहिलं आणि अगदी आपल्या घरापर्यंत आलं.

माझा स्वभाव अत्यंत आशावादी आणि सकारात्मक विचार करणारा असल्यामुळे असेल कदाचित पण कोणतीही प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आपल्याला खूप काही देऊन जाते ,शिकवते ,घडावते यावर माझा ठामपणे विश्वास आहे. कोविड 19 सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातोय ही वस्तुस्थिती आपण बदलू शकणार नाही.

पैसे आणि ओळख या घटकांना करोना ओळखतच नाही…. करोना ने communism म्हणजेच साम्यवाद परत आणलाय हे ही तितकंच खरं. कोविड 19 सर्वांना समान लेखतो आहे.लहान मोठं,गरीब श्रीमंत,जात धर्म त्याच्या खिजगणतीत नाहीये…माणसाला तो फक्त माणूस म्हणून बघतो…. आपल्यातीलअनेकांना ही पण एक त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट!!!

काका ला बी एम सी कोविड सेंटर मध्ये बेड मिळाला तेव्हा टाकलेला सुस्कारा मी कधीच विसरणार नाही.त्याला वाचवण्याची शर्थ करत असलेले आपले डॉक्टर…. अनेक पेशंट पैकी एक असलेल्या माझ्या काका साठी झगडणारे आपले सरकारी डॉक्टर्स,बी एम सी आणि आपली महाराष्ट्र सरकारची सिस्टीम यांना आज पुन्हा एकदा  मानाचा मुजरा!!

काही महिनायान पूर्वी माझे सासरे वय वर्ष 75 अख्खा एक महिना 4 दिवस के इ एम् ल राहून आले…. ते अत्यवस्थ असूनही जीवाची शर्थ करून सरकारी दवाखान्यातून, सगळी आपल्याला मोठी वाटणारी इंजेक्शन्स देऊन त्यांना बरा करूनच तिथून पाठवलं गेलं….अर्थात आम्ही त्यांना तेव्हा खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सुद्धा विचार केलाच जसे सगळे करतात….मात्र तेव्हा तेथील डॉक्टर्स नी सुद्धा विनंती केली की आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही सगळी शर्थ करतोय आणि आम्ही त्यांचं ऐकलं कारण शेवटी त्यांनाच आपल्यापेक्षा जास्त कळतं हे आम्हाला माहीत होतं आणि गूगलवर जाऊन औषधं आणि ट्रीटमेंट बद्दल उपलब्ध आणि अर्धवट माहिती मिळवण्याचा आमचा कोणाचाच स्वभाव नसल्याने आम्ही त्यांच्यावर तेव्हा पूर्ण विश्वास टाकला होता….जो त्यांनी सार्थ केला…..

आपलयाला संशय आहे की अशा विविध कोविड सेंटर मध्ये हे सरकारी डॉक्टर्स बघतील का आपल्या पेशंट ला नीट?त्यांना काय औषधं देत आहेत आपल्याला सांगत नाहीत…. कित्येक हजार पेशंट च्या प्रत्येक नातेवाईकाला माहिती देणं कितपत शक्य असेल त्या डॉक्टर्स ना? सरकारी प्रोटोकॉल प्रमाणे ते अत्यंत व्यवस्थित ट्रीटमेंट देतात असा अनुभव आम्हाला तरी आला आहे….  40/50 हजारांच इंजेक्शन बाहेर मिळत नाही इथे काय देणार?? अप्पा ना माझ्या सासऱ्यांना सर्व मोठी इंजेक्शन्स दिली गेली आणि ते व्यवस्थित बरे होऊन आले…त्यांच्या संपूर्ण ट्रीटमेंट च बिल होता रू.10/- फक्त!!

आता लस घेऊन छान नागाव ला जाऊन राहिले आहेत….

या सगळ्या परिस्थितीला अत्यंत ताकदीने आणि हिमतीने समोर जाणारे आणि त्याचा सामना करणारे डॉक्टर्स,नर्सेस,आया, वॉर्डबॉय ,पोलीस , मुंबईमहानगरपालिका,आपलं सरकार या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं…त्यांच्या माणुसकीचा प्रत्यय पावला पावला वर येतोय…आपण जिवंत राहावं म्हणून चाललेले त्यांचे प्रयत्न ते अजिबात ना सोडता सातत्याने करत आहेत…. त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवायची असेल तर किती आणि किती सोप्या गोष्टीची अपेक्षा आहे त्यांना? तर तुम्ही  काही दिवस शांतपणे आपापल्या घरात बसा… बास्स!!!!

 

https://www.facebook.com/phulawa.khamkar/posts/4492925844056147

महत्वाच्या बातम्या – 

‘महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय’…

वेंटिलेटरवर असणाऱ्या रूग्णाने असं काही केलंं की व्हिडीओ…

जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पेयांचे सेवन…

आता18 वर्षे पूर्ण वयाच्या लोकांना घेता येणार लस, रजिस्ट्रेशन…

…म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा…