कोरोनामुळे होतायेत पाळीव प्राणी बेघर

अमरावती | कोरोना व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. मात्र अनेक लोक कुत्र्यांसह घरातील पाळीव प्राण्यांना घरात ठेवण्यास नकार देत आहेत.

आता कोरोना व्हायरसचा फटका प्राण्यांनाही बसू लागला आहे. याच गोष्टींचे परिणाम लक्षात घेता अमरावतीमध्ये “युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट” शॉपचे संचालक समीर जनवंजाळ यांनी एक भावनिक आवाहन केलं आहे.

कोणीही आपले पाळीव प्राणी बाहेर रस्त्यावर किंवा जंगलात न सोडता आम्हाला दत्तक द्या. आम्ही त्यांना पोसतो, असं समीर जनवंजाळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अनेक जण या सर्व पाळीव प्राण्यांना जंगलात किंवा इतर ठिकाणी सोडत आहे. त्यामुळे हे पाळीव प्राणीसुद्धा बेघर होत आहे. या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर न सोडता मला दत्तक द्या, असं आवाहन अमरावतीमध्ये करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“ठरलेल्या तारखेसच होणार सर्व बोर्डांच्या व विद्यापीठांच्या परीक्षा”

-षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? फिल्डर बॉल शोधून शोधून दमले

-धोक्याची घंटा; कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात!

-आम्ही अगदी सेम टु सेम कॉपी… फडणवीसांसोबतचा टिकटॉक व्हिडीओ होतोय व्हायरल

-शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद- अजित पवार