कोरोनाचा पुन्हा विस्फोट! ‘या’ ठिकाणी सापडतात दर सेकंदाला दोन रूग्ण

नवी दिल्ली | कोरोनाची साथ आल्यापासून वेगवेगळ्या देशात कोरोनाची तिसरी, चौथी आणि पाचवी अशा लाटा आतापर्यंत आल्या आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक विस्फोट झाला आहे. त्यातच आता फ्रान्समधून (France) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

कोरोना संसर्गाला सुरूवात झाल्यापासून फ्रान्समध्ये इतकी उच्चांकी पातळी गाठली होती. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांमध्ये  2,08,000 दोन लाख 8 हजार इतक्या रूग्णांची नोंद झाली आहे.

फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन (French Health Minister Olivier Vernon) यांनी  परिस्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं आहे. ओलिवियर वेरन यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रान्समध्ये दर सेकंदाला दोन लोक पॉझिटिव्ह येत आहेत. यापुर्वी फ्रान्समध्ये एका दिवसात 1,80,000 इतके रूग्णसंख्या आढळून आली होती.

पॅरिसमध्ये अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलेल्या रूग्णांपैकी 70 टक्के रूग्ण हे लसीकरण झालेले नसल्याची माहिती आहे. तसेच वेरन यांनी सांगितलं आहे की, कोरोनाचा हा विस्फोट कोरोनाच्या डेल्टा (Delta Variant) प्रकारामुळे झाला आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सद्यस्थितीत फारसा काही परिणाम झालेला नाही. मात्र, फ्रान्समधील कोरोनाची परिस्थिती खुप वेगाने बिघडत आहे. गेल्या काही दिवसांत संसर्गाचा वेग उच्च पातळीवर पोहोचला आहे, असं फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

त्यातच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट हे डबल डेंजरस असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढण्याची भीती आहे, असंही म्हटलं आहे.

डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉन विषाणूने आरोग्य यंत्रणा कोलमडण्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मला ओमिक्रॉन संबंधात फार चिंता आहे. डेल्टा व्हेरिएंट असतानाचं ओमिक्रॉन आल्याने कोरोना केसेसची त्सुनामी येत आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सांगितलं आहे.

फ्रेंच लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के लोक कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहे. कोरोना संसर्गाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, ज्या लोकांना बुस्टर लसीचा डोस मिळालेला नाही. त्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. याकारणामुळे अतिरिक्त खबरदारी घेण्याचं आवाहन फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पार्थ पवार म्हणतात,”आत्या तुम्ही काळजी घ्या, तुम्ही दोघं लवकरच…”

पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा गौप्यस्फोट, आता अजित पवार म्हणाले…

“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”