महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरुन 5 वर आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना दिली.

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर आणण्यात यश मिळालं आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे, असं राजेश टोपो यांनी सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असंही टोपेंनी सांगितलं आहे.

मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-दिलासादायक! गेल्या 14 दिवसात 78 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

-“सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करुन राज्याच्या हितासाठी सकारात्मक पाऊल टाका”

-रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

-‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा

-राज ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला तृप्ती देसाईंचा विरोध