मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण; 50 जवानांना क्वारंटाईन

भोपाळ | मध्य प्रदेशात एका बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. जवानाला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. लागण झालेल्या जवानासोबत असलेल्या 50 इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यात टेकनपूर येथे बीएसएफ जवानांचे आधुनिक ट्रेनिंग सेंटर आहे. या सेंटरमधील एका अधिकाऱ्याची तपासणी केली असता त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं.

कोरोनाची लागण झालेल्या जवानाची पत्नी नुकतेच लंडनवरुन भारतात परतली होती. त्यामुळे पत्नीद्वारे या जवानाला कोरोनाची लागण झाली असावी, असं सांगितलं जात आहे.

देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशा आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

-नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन

-हा निधी माझ्या आईकडून माझ्या आईसाठीच आहे- अक्षय कुमार

-इटलीत कोरोनाचा कहर; मृतांची संख्या 10 हजाराच्या वरती

-सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!