अहमदनगर | मागील काही दिवसांपूर्वी कोरोना (Corona) रूग्णसंख्या कमी झाल्याने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोना रूग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. (Corona infiltrates as soon as the school opens)
ओमिक्राॅनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू लावले आहेत. अशातच आता महाराष्ट्रात देखील रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
1 डिसेंबरपासून राज्यात पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना वाढत असताना आणि ओमिक्राॅनचं संकट डोक्यावर असताना शाळा उघडणं धोक्याचं ठरताना दिसत आहे.
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी नवोदय विद्यालयात काही विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर आता आणखी 33 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
शाळेतील 428 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यातील 33 जणांचे रिपोर्टस कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.
या 33 जणांपैकी 19 विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. रिपोर्ट मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना जवळच्या ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
दरम्यान, शाळेतील काही विद्यार्थ्यांना ताप जाणवू लागल्याने कोरोना टेस्ट केली गेली होती. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“असं काही घडू नये, पण घडलंच तर…”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
‘मला संपवण्याचा कट होता, एक गाडी…’; पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप
‘… त्यासाठी डोकं आणि अक्कल लागते’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
“जीन्सवाल्या पोरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, ते…”
…म्हणून या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो- नरेंद्र मोदी