नवी दिल्ली | चीनमध्ये आता कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसत आहे. मागील महिन्याभरापासून चीनमध्ये लाॅकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यामुळे आता भारतात पुन्हा कोरोना धुमाकूळ घालणार की काय?, अशी चिंता आता सर्वांना लागली आहे.
मागील तीन दिवसांपासून काही राज्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना पत्र लिहीत संकटाचा इशारा दिला होता. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: देशातील नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे.
कोरोना व्हायरस संपलेला नाही आणि तो पुन्हा कधीही वाढू शकतो, त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या आणि दुर्लक्ष करू नका, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. कोरोना हा एक बहुरूपिया आजार आहे. तो कधीही येऊ शकतो, असंही मोदी म्हणाले आहेत.
लोकांचं कोरोना आजारापासून रक्षण करण्यासाठी जवळपास लसींचे 185 कोटी डोस दिले गेले आहेत, अशी माहिती देखील मोदींनी दिली आहे. आपण एवढा मोठा टप्पा गाठला याबद्दल जग आश्चर्य व्यक्त करतं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, लोकांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, असं म्हणत त्यांनी देशातील नागरिकांचं कौतुक केलं आहे. गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वंथली येथील माँ उमिया धामच्या महोत्सव कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात तृप्ती देसाई आक्रमक; थेट गृहमंत्र्यांनाच पाठवले व्हिडीओ
“गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही”
“तुम्ही काय हिंदूत्वाचं पेटंट घेतलंय का?”, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर
गालावरचा KISS तिनं ओठांवर घेतला अन्…; अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागांतील वीजपुरवठा उद्या बंद राहणार