कोरोनामुळे देशात ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यानं खळबळ

नवी दिल्ली | संपू्र्ण जगभरात कोरोना नावाच्या महामारीनं कमालीचा हाहाकार माजवला होता. या महासाथीच्या काळात अनेकांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं.

कोरोना संसर्ग आता काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत आहे. पहिल्यापेक्षा बऱ्याच अंशी कोरोनाचा शिरकाव कमी झाला आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोना महासाथीच्या रोगानं किती जणांचा मृत्यू झाला याविषयी जागतिक आरोग्य संघटनेनं मोठं वक्तव्य केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षात जगभरात सुमारे 15 दशलक्ष लोकांनी कोरोना व्हायरसमुळे किंवा आरोग्य प्रणालींवर झालेल्या परिणामांमुळे आपले प्राण गमावले आहेत.

सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार कोविडमुळे किंवा आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. वाढती रुग्णसंख्येमुळं भीतीचं सावट घोंगावत होतं. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढ होत होती. सध्या ही परिस्थिती आटोक्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना नियंत्रणात येत असला तरी योग्य ती काळजी घेण्याचं, शासनानं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –  

  “राज ठाकरेंच्या मनसे बरोबर युती करणं भाजपला परवडणार नाही”

  “राज ठाकरेंना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच भोंग्याचा त्रास सुरू झाला”

 भोंग्याच्या वादावर केंद्रीय मंत्र्याची राज ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले…

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर