मुंबई | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं महाराष्ट्रातही शिरकाव केलाय. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत चाललीय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने खबरदारी म्हणून पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्यण घेतला आहे.
पक्षाकडून कोणत्याची प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम आणि जाहीर सभा घेतली जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने कोरोना संकट दूर होईपर्यंत सभा, बैठका आयोजित करणार नाही. याबाबत पक्षाने निर्णयच घेतला आहे. इतर पक्षांनीही हे पाऊल उचलावं. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक आहे, असं सांगत नवाब मलिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाचे एकूण 11 रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आढावा बैठक घेतली. लोकांनी घाबरुन न जाता सतर्कता बाळगावी. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान: कोरोनाची माहिती व्हाॅट्सअॅपवर शेअर केली तर होऊ शकते कारवाई
-…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!
-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलीस करणार ‘ही’ कडक कारवाई
-“कोरोनाचं नाव पुढं करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत”
-“उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी ‘हे’ लक्षात ठेवलेलं बरं”