Top news देश

सावधान! समोर आली कोरोनाची नवी लक्षणं; प्रत्येकालाच माहीत असायला हवीत

नवी दिल्ली | कोरोना विषाणूनं जगभर थैमान घातलंय. दर काही दिवसांनी या विषाणूबद्दल नवीन संशोधन होतं आणि नवीन माहिती समोर येते. आताही असंच एक नवं संशोधन समोर आलं आहे. ज्यामध्ये काही कोरोना विषाणूच्या नवीन लक्षणांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

ब्रिटीश तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार लहान मुलांना उलट्या होणं तसेच अतिसार, पोटातील वेदना ही कोरोनाची नवी लक्षणं असू शकतात. क्वींस युनिवर्सिटी लहान मुलांवर हा रिसर्च करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांना कोरोनाची ही नवी लक्षणं आढळून आली आहेत.

कुणाला ताप आला, खोकला आला किंवा चव न समजणं, वास न येणं अशी लक्षणं कोणत्याही व्यक्तीमध्ये असल्यास त्याला आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो. तसंच त्यांची चाचणी सुद्धा केली जाते. ब्रिटनच्या तज्ज्ञांनी लहान मुलांवर केलेल्या रिसर्चमधून यासंदर्भात नवा खुलासा समोर आला आहे.

लहान मुलांच्या या संशोधनासाठी १ हजार लहान मुलांची निवड करण्यात आली होती. मेडरेक्सिमध्ये यासंदर्भातील संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनानूसार ९९२ लहान मुलांपैकी ६८ मुलांच्या शरीरात कोरोनाशी लढत असलेल्या अँटीबॉडीज दिसून आल्या आहेत तर १० मुलांमध्ये कोरोनाची लक्षणंही दिसून आली. त्यापैकी कोणालाही रुग्णालयात भर्ती करण्याची वेळ आली नाही.

विषाणूमुळे लहान मुलांना फार त्रास झाला नाही ही चांगली गोष्ट आहे, मात्र या मुलांमध्ये अतिसार आणि उलट्या ही लक्षणं दिसून आली. या लक्षणांना कोरोना लक्षणांच्या यादीमध्ये जोडण्याचा आम्ही विचार करत आहोत.  अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोलनं कोविड १९ च्या लक्षणांमध्ये मळमळणं, उलट्या होणं, अतिसार या लक्षणांना सहभागी करून घेतलं आहे, असं या संशोधनाचे प्रमुख डॉ. टॉम वाटर फील्ड यांनी सांगितले आहे.

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रीवेंशन (सीडीसी)नं दिलेल्या माहितीनुसार, ताप येणं, थंडी वाजून शरीर थरथर कापणं, मांसपेशींमधल्या वेदना, घसा खराब होणं ही कोरोनाची लक्षणं आहेत. काही लोकांमध्ये ५ दिवस तर अनेकांमध्ये १४ दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसतात. आराम केल्यानं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेतल्यावर रुग्ण बरा होऊ शकतो.

तसेच जेव्हा रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे किंवा रुग्णाला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे. याबाबत माहिती घेतली जाते आणि त्यानूसार उपचार केले जातात.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतप्रकरणी रियाचा भाऊ शौविक सोबतच सॅम्युअल मिरांडाही गजाआड, रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! 9 तास झोपा आणि लाखो रुपये कमवा; भारतीय कंपनी देतेय आगळीवेगळी संधी

सुशांतच्या डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा; ‘या’ आजारानं सुशांत त्रस्त होता

युवक काँग्रेसला मोठा झटका; गटबाजीला कंटाळून सच्च्या शिलेदाराचा राजीनामा

सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!