‘या’ ठिकाणी आढळला कोरोना नवा व्हेरियंट, 7 जण बाधित

पुणे | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षात हाहाकार माजवला होता. संपूर्ण जगावर या महासाथीच्या रोगाचा गंभीर परिणाम पहायला मिळाला.

काही दिवसांपासून कोरोनापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांमध्ये आणि शिथिलता करण्यात आली आहे. याशिवाय मास्क सक्तीही हटवण्यात आली आहे.

कोरोना नियंत्रणात येत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा चिंतेचं सावट पहायला मिळत आहे.

कोरोनाविषयी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये नवा व्हेरियंट आढळला आहे.

एकूण सात जणांना या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. याविषयीची माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे सब व्हेरियंट बी.ए. 4 चे चार आणि बी.ए.5 यांचे तीन रुग्ण आढळले आहेत.

नव्या व्हेरियंटचा शरीरावर फार घातक परिणाम होत नसल्याचं डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

  मोठी बातमी! राज्यात ‘इतक्या’ हजार पदांसाठी पोलीस भरती

  पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  टेस्ला कार भारतात आणण्याविषयी Elon Musk यांचा मोठा निर्णय, म्हणाले…

  ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची सुटका मात्र समीर वानखेडेंच्या अडचणींत मोठी वाढ