महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर

मुंबई | जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस देशभर पसरु लागला आहे. कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात काल कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत तर एक रुग्ण पुण्यातील आहे.

नवीन 11 रुग्णांपैकी 8 जण परदेशातून आले होते तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-म्हणुन… अ‍ॅपलचे आयफोन्स एकापेक्षा जास्त खरेदी करता येणार नाहीत

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पेट्रोलपंप आजपासून राहणार अर्धावेळ बंद

-अमेरिका ते भारत… ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असलेल्या अमेय वाघचा चित्तथरारक अनुभव

-“ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलंच नाही.”

-उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार!; कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका