‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला गंभीर इशारा

मुंबई | देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यात कोरोनाचा वाढता धोका बघता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर राज्यातील 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे, असा गंभीर इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

पहिल्या लाटेत 20 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक कोरोनाबाधित झाले होते. दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे, अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे.

तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. केंद्राने सध्या फक्त आयसीयुसाठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

केंद्राने कोवीड सेंटरसह इतर कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. शिवाय केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राजेश टोपेंनी केंद्र सरकारकडे केली आहे.

लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत याची केंद्राने एक नियमावली करून द्यायला हवी. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केंद्राकडे अनेक मागण्या केल्या असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीविषयी आरसीएमआरचे डायरेक्टर डॉ. बलराम भार्गव यांच्याशी चर्चा केल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात जर कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असेल तर निर्बंध लावायला काहीच हरकत नसल्याचं मत डॉ. भार्गव यांनी व्यक्त केलं असल्याचं देखील राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! राज्याची आकडेवारी 18 हजाराच्या पार

महाराष्ट्र पोरका झाला! सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

“जितेंद्र आव्हाडांविरोधात अॅट्राॅसिटी दाखल करा”; सदावर्तेंची आक्रमक मागणी

वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात, “भीक नहीं अधिकार चाहिये…”

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचा ताजा भाव