ऐकावं ते नवलच!; व्हायग्रामुळे 45 दिवस कोमात असलेली नर्स झाली बरी

नवी दिल्ली | अगदी अल्पावधीत एका गोळीनं सर्वत्र धुमाकुळ घातला होता ती गोळी म्हणजे व्हायग्रा आहे. व्हायग्रा या गोळीला तिच्या मुळ आजारासाठी कमी आणि इतर आजारांवरील उपाय म्हणूनच जास्त प्रसिद्धी मिळाली होती.

व्हायग्रा बाजारात सेक्स सुखासाठी आणली गेली. सेक्सचा आनंद आधिकाधिक वाढावा यासाठी बाजारात व्हायग्रा आली. तेव्हापासून ती गोळी चर्चेत आहे. परिणामी व्हायग्रा अनेकदा वादातदेखील सापडली होती.

लाखो लोकांच्या लैंगिक सुखाचा आनंद या गोळीच दुप्पट केल्याचा दावा या गोळीबाबत केला जातो. तसंच या गोळीचे अनेक दुष्परिणाम सुद्धा समोर आले आहेत. परिणामी काहींनी चिंतादेखील व्यक्त केली आहे.

सध्या जगभरात व्हायग्राचा सर्रास वापर करण्यात येत आहे. जगभरातील सेक्सबाबतच्या अभ्यासाच व्हायग्रा हा भाग झाला आहे. व्हायग्रा अनेकदा दुष्परिणामांमुळे चर्चेत आली आहे.

सध्या मात्र व्हायग्राच्या एका चमत्काराची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कोरोनामुळं कोमात गेलेली नर्स तब्बल 45 दिवसानंतर व्हायग्रा या गोळीमुळं बरी  झाली आहे. परिणामी या गोळीची परत एकदा चर्चा चालू झाली आहे.

इंग्लंडमधील गेन्सबरो लिंकनशायर येथील मोनिका अल्मेडा या 37 वर्षीय नर्सला कोरोना झाला होता. उपचारादरम्यान अल्मेडांची स्थिती आणखीनच बिघडली आणि त्या कोमात गेल्या.

दिवसेंदिवस अल्मेडाची अवस्था खराब होत होती. पणहकाऱ्यां त्यांच्या सनी आणि डाॅक्टरांनी अल्मेडा यांना व्हायग्रा गोळी दिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या लागलीच बऱ्या झाल्या आहेत.

मोनिका शुद्धीत आल्यानंतर त्यांनी डाॅक्टरांचे आणि आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. मला नंतर सांगण्यात आलं की माझ्या उपचारात व्हायग्रा गोळीचा वापर करण्यात आला आहे, असं मोनिका अल्मेडा यांनी सांगितलं आहे.

व्हायग्राच्या वापरामुळं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीनं चालतं. फुफ्फुसांमध्ये फोस्पोडायस्टेरियस एंझाइम तयार झाल्यामुळं रक्ताभिसरण सुधारतं, असं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, व्हायग्राचा अनेकदा अनेक कारणांनी उपयोग सिद्ध झाला होता. पण आता याचा वापर एका कोरोना रूग्णावर झाल्यानं परत एकदा व्हायग्रा जगप्रसिद्ध झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!

“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”

ओमिक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!

कोरोनाबाधित असूनही सुप्रिया सुळेंनी घेतली निलेश लंकेंची भेट?; भाजपकडून टीकेची झोड

आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रुझवर अडकले 2000 प्रवासी; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर