HIV रुग्णाच्या शरीरातच झालं तब्बल 21 वेळा कोरोना म्यूटेशन, समोर आलं धक्कादायक कारण

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षापासून अवघ्या जगात थैमान घातलं आहे. जगभर कोरोनाची दहशत पहायला मिळत आहे. अशातच सातत्यानं कोरोनाची भयानक प्रकरण समोर येत आहेत.

कोरोना काळात गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या अनेक व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. डेल्टा, ओमिक्राॅन, अल्फा या व्हेरियंटच्या माध्यमातून कोरोनानं प्रचंड नुकसान केलं आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्यानंतरही अवघ्या काही महिन्यांच बाळ वाचल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता कोरोनाचे अनेक प्रकार एकाच महिलेच्या शरीरात सापडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.

एका महिलेच्या शरीरात कोरोनानं 21 बदल केले आहेत. कोरोना व्हायरसमध्ये तब्बल 21 वेळा एकाच शरीरात म्युटेशन झालं आहे. परिणामी सध्या या महिलेची चर्चा जगभर होत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचं हे धक्कादायक प्रकरण आहे. कोरोना झालेल्या महिलेला अगोदरच एचआयव्ही होता. तब्बल 9 महिने तिच्या शरीरात कोरोना होता. या काळात तब्बल 21 वेळा कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन झालेलं आढळलं.

कोरोना झाल्यानंतर महिलेच्या शरीरात बिटा व्हेरियंट आढळला होता. तिच्या शरीरात बिटा आढळला तेव्हा भारतात दुसरी लाट आलेली होती. त्यानंतर महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

कोरोनानं त्या महिलेच्या शरीरात स्वत: मध्ये बदल करायला सुरू केले. 10 म्युटेशन कोरोनाच्या स्पाइक प्रोटिनमध्ये झाले. याच स्पाइक प्रोटिनमार्फत मानवी शरीरात प्रवेश करतो.

महिलेच्या शरीरात कोरोनानं पहिल्या 10 म्युटेशननंतर परत 11 म्युटेशन झालं. व्हायरसमध्ये असे बदल दिसून आले जे ओमिक्राॅन आणि लॅम्डा व्हेरियंटमध्ये आहेत.

दरम्यान, महिलेला कोरोनातून बरं होण्यासाठी तब्बल 6-9 आठवड्यांचा कालावधी गेला आहे. सध्या कोरोना आणि इतर व्हेरियंटवर संशोधन चालू असताना अशी प्रकरणं समोर आल्यानं संशोधक अचंबित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

 Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर

क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा 

Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा 

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा