पुणे | कोरोनाच्या (Pune Corona) दोन्ही लाटेत सर्वांचंच मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आता आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.
मागील दोन दिवसात कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन कोरोनाबाधित रूग्ण दुप्पटीने वाढल्याचं चित्र आहे. अशातच आता ओमिक्राॅन व्हेरियंटने पुण्याचं टेन्शन वाढवलं आहे.
पुण्यात आज दिवसभरात 524 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,11,141 इतकी आहे. तर पुण्यात 2,514 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 9,118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 6,786 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
फक्त कोरोनाच नाही तर ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येचा देखील पुण्याच उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासाच ओमिक्राॅन रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे.
मागील 24 तासात राज्यात नव्या 50 ओमिक्रॅान रूग्णांचं निदान झालं आहे. त्यातील सर्वांत जास्त रूग्ण हे पुण्यात आढळले आहेत.
पुण्यात आज 50 पैकी 36 ओमिक्राॅनबाधित रूग्ण आढळले आहेत. तर पिपंरी चिंचवडमध्ये देखील 8 ओमिक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, कोरोना आणि ओमिक्राॅन रूग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्यानं आता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काळजी घ्या! गेल्या 24 तासातील धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर
‘…तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
“…म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं”
कोरोनाचा हाहाकार! ‘या’ राज्यात उद्यापासून शाळा-काॅलेज बंद, नाईट कर्फ्यू लागू
तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर