नवी दिल्ली | मागील वर्षी कोरोना (Corona Restriction) महामारीने देशभर थैमान घातलं होतं. भारतात कोरोनाच्या 3 लाटा आतापर्यंत आल्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय.
कोरोना काळात आरोग्य व्यवस्था अक्षरश: मोडकळीस आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने कोरोना निर्बंध लागू केले होते. अशातच आता केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.
पहिल्या लाॅकडाऊनला आता 2 वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारने बुधवारी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 31 मार्चपासून देशातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश देण्यात आला आहे.
सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला असला तरी सहा फुटाचं अंतर आणि मास्क घालणं हे दोन नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता देशातील नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच आता केंद्राने कोरोना निर्बंध हटवण्याने कोरोनाचा धोका वाढण्याची देखील शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Vaccine: पुण्यातील कंपनीने ‘चोरी’ करून लस बनवली?, तब्बल 7200 कोटींचा खटला दाखल
एसटी कर्मचाऱ्यांना धक्का! मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
“उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?”
Russia Ukraine War: नको तेच झालं! रशियाकडून युक्रेनवर ‘फॉस्फरस बॉम्ब’चा वापर, आता…
“मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचेsss पाहुणे”, व्हिडीओ शेअर करत मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला